Ad will apear here
Next
माझा मराठाचि बोलु कौतुकें


२७ फेब्रुवारीला मराठी राजभाषा दिन असतो. त्या निमित्ताने आजपासून प्रसिद्ध करत आहोत मराठीचं कौतुक करणाऱ्या काही कविता. या उपक्रमाची सुरुवात संत ज्ञानेश्वरांच्या रचनेपासून...
...........
माझा मराठाचि बोलु कौतुकें । परि अमृतातेंही पैजां जिंके ।।
ऐसीं अक्षरें रसिकें । मेळवीन ।।१।।

जिये कोंवळिकेचेनि पाडें । दिसती नादींचे रंग थोडे ।
वेधें परिमळाचें बीक मोडे। जयाचेनि।।२।।

ऐका रसाळपणाचिया लोभा । कीं श्रवणींचि होती जिभा ।
बोलें इंद्रियां लागे कळंभा। एकमेकां।।३।।

सहजें शब्दु तरी विषो श्रवणाचा । परि रसना म्हणेरसु हा आमुचा ।
घ्राणासि भावो जाय परिमळाचा । हा तोचि होईल ।।४।।

नवल बोलतीये रेखेची वाहणी । देखतां डोळयांही पुरों लागे धणी ।
ते म्हणती उघडली खाणी । रुपाची हे ।।५।।

जेथ संपूर्ण पद उभारे । तेथ मनचि धांवे बाहिरें ।
बोलुं भुजांहीं आविष्करे । आलिंगावया ।।६।।

ऐशीं इंद्रियें आपुलालिया भावीं । झोंबती परि तो सरिसेपणेंचि
बुझावी । जैसा एकला जग चेववी । सहस्रकरु ।।७।।

तैसें शब्दाचें व्यापकपण । देखिजे असाधारण ।
पाहातयां भावज्ञां फावती गुण । चिंतामणीचे ।।८।।

हें असो तया बोलांची ताटें भलीं । वरी कैवल्यरसें वोगरिलीं ।
ही प्रतिपत्ति मियां केली । निष्कामासी ।।९।। 

- संत ज्ञानेश्वर
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZQWCJ
Similar Posts
जैसी हरळांमाजी रत्नकिळा... ‘मराठी भाषा म्हणजे जणू कस्तुरी आणि कल्पतरूच,’ असं म्हणणारी फादर ख्रिस्तदास थॉमस स्टीफन्स यांची कविता आज पाहू या...
माझ्या मराठी मातीचा... आज २७ फेब्रुवारी, कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिन. अर्थात मराठी राजभाषा दिन. त्या निमित्ताने पाहू या, ‘माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा’ असं सांगणारी कुसुमाग्रजांची कविता...
माझी बोली असे मराठी मराठी बोली अन् भाषा कशी श्रेष्ठ आहे, हे सांगणारी ‘माझी बोली असे मराठी’ ही मा. रा. पोतदार यांची कविता आज पाहू या...
नमो हे महाराष्ट्रवागीश्वरी भक्तीपासून शौर्यापर्यंत मराठी कशी वैशिष्ट्यपूर्ण आहे, हे सांगणारी रा. अ. काळेले यांची ‘नमो हे महाराष्ट्रवागीश्वरी’ ही कविता आज पाहू या.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language